The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यात मराठी माध्यमांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या भरमसाठ आहे. तर दुसरीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळेची संख्याही वाढली आहे. याचा परिणाम शहरी व ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या शाळा पटसंख्येवर झाला. आता नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे अशात शाळेतील शिक्षक इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी धावपळ करतांना दिसत आहे.
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या १ हजार ४६४ शाळा आहे तर खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित व विनाअनुदानित मिळून जवळपास ४०० शाळा आहेत. तर याशिवाय आदिवासी विकास विभागातर्गत अनुदानित व विनाअनुदानित मिळून १०० आश्रम शाळा आहेत. इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंट व शाळांची संख्या १००० च्या आसपास आहे. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळांची एकूण संख्या २ हजार एवढी आहे. या सर्व शाळांना पुरेसे विद्यार्थी मिळविणे गेल्या सात आतज वर्षांपासून खडतर झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा उष्णतेचा पारा ४४ अंशावर पोहचत आहे तरी सुद्धा अशा भर उन्हात अनेक शिक्षक गडचिरोली शहरानजीकची गावे, वार्डावार्डात विद्यार्थ्यांच्या गृहभेटी घेऊन आपल्या शाळेत विद्यार्थी प्रवेश कसा घेणार याकरिता विविध माहिती देत आहेत. या माध्यमातून काही विद्यार्थी प्रवेश सुद्धा करतानाचे दिसते तर काही पालक स्वमर्जीने आपल्या पाल्यांना शाळेत प्रवेशित करीत आहेत. तर जिल्हा परिषद शाळेबाबत चित्र उलटे आहे. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता फुलोरा उपक्रमातून वाढत असून गावातील पालक जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य देत आहेत हे विशेष.