– शिक्षकाला अटकी
The गडविश्व
कोल्हापूर : शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अर्जुनवाडा ता. कागल येथे उघडकीस आली आहे. कोल्हापूर, मुरगूड पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, त्याच गावातील एक शिक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याकडे लग्न करण्याचा तगादा लावला होता. गेल्या महिना दीड महिना पासून तिला त्रास देत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. आकांक्षा तानाजी सातवेकर (19) असे मृत तरुणीचे नाव आहे. कोल्हापूर, मुरगूड पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून अमित भीमराव कुंभार या शिक्षकाला आज अटक केली आहे.