–मोदुमतूर्रा, खेडेगाव येथे शिबीर
The गडविश्व
गडचिरोली, १० नोव्हेंबर : गावकऱ्यांच्या मागणीनुसार मोदुमतूर्रा, खेडेगाव या दोन्ही गावांमध्ये मुक्तीपथ अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवर व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण २१ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.
अहेरी तालुक्यातील मोदुमतूर्रा येथे एक दिवसीय व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. शिबिरात एकूण 9 रुग्णांनी नोंदणी करून पूर्ण उपचार घेतला. शिबिराचे नियोजन तालुका प्रेरक आनंदराव कुम्मरी व स्वप्नील बावणे यांनी केले. शिबिरासाठी गावांतील ग्रामपंचायत सदस्य शालिनी कांबळे, विनोद आलम व इतर गावकरी यांनी सहकार्य केले. शिबिरामध्ये समुपदेशक साईनाथ मोहूर्ले यांनी रुग्णांची तपासणी व धोक्याचे घटक सांगितले. संयोजिका पूजा येल्लूरकर यांनी केस हिष्ट्री घेत रुग्णांना दारूचे दुष्परिणाम समजावून सांगीतले.
कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव येथे गावपातळी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. त्यात १३ रुग्णांनी नोंदणी केली व १२ रुग्णांनी उपचार घेतला. प्राजू गायकवाड यांनी समुपदेशन केले. संयोजक प्रभाकर केळझरकर यांनी रुग्णांची केस हिस्ट्री घेतली. रुग्णांची नोंदणी मयूर राऊत व कान्होपात्रा राऊत यांनी केली. यावेळी सरपंच यमुलता पेंदाम, उपसरपंच भूमेश्वर सोनवणे , पोलिस पाटील पुरशोत्तम नाट , ग्राप कर्मचारी, गाव संघटन चे सदस्य उपस्थित होते.