The गडविश्व
गडचिरोली : गडचिरोली वनविभाग,गडचिरोली अंतर्गत असलेले शिल्पग्राम येथे अनुसूचित जमातीतील युवक-युवतींकरीता बांबु हस्तकला करीता प्रशिक्षण सुरु करण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षणाकरीता प्रशिक्षणार्थी यांची आवश्यकता असल्यामुळे ईच्छुकांनी अधिक माहिती घेण्याकरीता वनपरिक्षेत्र अधिकारी,मुख्यालय गडचिरोली पोटेगांव रोड,उपवनसंरक्षक,गडचिरोली वनविभाग,गडचिरोली यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा.पात्रता किमान 8 वी पास,अर्ज सादर करण्याची अंतिम 14 मार्च 2022,प्रशिक्षणार्थी राहण्याची व जेवणाची सोय करण्यात करण्यात येणार आहे.असे उपवनसंरक्षक (प्रादे.) तथा अध्यक्ष, शिल्पग्राम प्रकल्प समिती गडचिरोली वनविभाग, गडचिरोली यांनी कळविले आहे.