The गडविश्व
मुंबई, ४ जुलै : राज्याच्या राजकारणात धक्कादायक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे – फडणवीस सरकार अस्तित्वात आले असताना पुन्हा एका शिवसेनेच्या आमदाराने शिंदे गटाचा हात धरला आहे.
हिंगोली मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे संतोष बांगर हे उद्धव ठाकरे समर्थक आमदार होते. हे आमदार उद्धव ठाकरेंना आपण एकनिष्ठ असल्याचे सांगत भावूक झालेले दिसून आले होते. परंतू आज हे देखील शिंदे गटात दाखल झाल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानले जात आहे.
परंतू अपात्रतेच्या कारवाईच्या भितीने बांगर शिंदे गटात दाखल झाले की काय ? याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. बांगर यांच्या जाण्याने उद्धव ठाकरे यांना पुन्हा धक्का बसला असून उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना आमदारांची संख्या १५ राहिली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या ४० इतकी झाली आहे.