शेतात काम करत असतांना वाघाचा हल्ला : महिला ठार

1456

– आरमोरी तालुक्यातील अरसोडा शेत शिवारातील घटना
The गडविश्व
आरमोरी : शेतात काम करत असतांना वाघाने हल्ला करून महिलेस ठार केल्याची घटना आज १३ मे रोजी सकाळच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील अरसोडा शेतशिवारात घडली. नलुबाई बाबूलाल जांगळे (३५) असे मृतक महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार नलुबाई ह्या रोजच्या प्रमाणे स्वताच्या शेतावर काम करण्याकरिता सकाळच्या सुमारास गेल्या. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने नलुबाईवर हल्ला केला यात नलुबाई यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच नागरिकांनी घटनस्थळाकडे धाव घेतली असता नरभक्षक वाघ तिथेच दबा धरून बसला होता व आरडाओरड केल्यानंतर त्याने तिथून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली असे प्रत्यक्षदर्शी ने सांगितले आहे. नलुबाई यांच्या मृत्यूने परिवारावर शोककळा पसरली आहे. सदर घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here