शेतात काम करत असतांना वाघाचा हल्ला ; शेतकरी महिला गंभीर जखमी

1637

– उपचाराकरिता गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल
The गडविश्व
गडचिरोली(Gadchiroli), २७ सप्टेंबर : जिल्ह्यात वाघाचे मानवावरील हल्ल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. शेतात गवत कापत असतांना वाघाने हल्ला करून शेतकरी महिलेस गंभीर जखमी केल्याची घटना आज २७ सप्टेंबर रोजी दुपारी ०२.३० वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गिलगाव शेतशिवारत घडली. सुमनबाई डोकाजी भोयर (६०) मु.पोस्ट गीलगाव ता.चामोर्शी जि. गडचिरोली असे जखमी महिलेचे नाव आहे.
सुमनबाई डोकाजी भोयर ह्या नेहमीप्रमाणे शेतात गेल्या होत्या. आज शेतात गवत कापत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला यात त्या गंभीर जखमी झाल्या. तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचाराकरिता दादाराव चव्हाण यांच्या वाहनाने हलविण्यात आले असून उपचार सुरू आहे. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यात वारंवार वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असल्याने मानव वन्यजीव संघर्ष होण्याची शक्यताही वर्तविली असून अशा नरभक्षक वाघास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे.

©©©©

(Gadchiroli Tiger Attack Chamorshi Gilgaao )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here