The गडविश्व
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सर्च शोधग्राम येथील माँ. दंतेश्वरी रुग्णालयात २६ फेब्रुवारी २०२२ दरम्यान मेंदुविकार ओपिडी घेण्यात आली. या ओपिडी मध्ये गडचिरोली सह आजुबाजूच्या जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आला. या ओपीडी मध्ये स्ट्रोक (अर्धांगवायू / पॅरालिसिस) बरोबरच झटक्यांचा (मिरगी) आजार, विविध मज्जातंतू चे आजार, पार्किन्सन आजार, अल्जायमर आजार, जुनाट डोके दुखी, लहान मुलांचे मेंदूचे आजार, चक्कर येण्याचे अनेक आजार (vertigo), मद्यपानामुळे होणारे मेंदुविकार अशा अनेक आजारांवर मेंदुविकार तज्ञ डॉ. ध्रुव बत्रा (Neurologist) यांच्या कडून उपचार करण्यात आला. या ओपीडी ची जबाबदारी सर्च मधील वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकिता मांजरमकर यांनी पुर्णपणे सांभाळली.
सर्चच्या सह संस्थापक डॉ. राणी बंग व डॉ. ध्रुव बत्रा यांच्या नेतृत्वात सदर ओपिडी घेण्यात आली. रुग्णालय प्रशासकीय अधिकारी विनोद भांडेकर यांनी या ओपिडीची व्यवस्था सांभाळली.
