The गडविश्व
गडचिरोली : संशोधकांचे कार्य आजच्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना प्रेरणादायी ठरावे. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा , या अनुशंगाने विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातून विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वाढीस लागेल असे असे प्रतिपादन विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ . सुरेश रेवतकरकर यांनी केले .
पदव्युत्तर शैक्षणिक विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे नॅशनल सायन्स डे निमित्त ‘पोस्टर प्रेझेंटेशन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण विद्यापीठ सभागृहात पार पडले. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी मंचावर गणित विभागाचे विभाग प्रमुख तसेच संचालक विद्यार्थी विकास डॉ. शैलेंद्र देव, प्रमुख अतिथी म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपुर च्या अनघा पाटील उपस्थित होत्या.
‘विज्ञान आणि जीवन’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या , विज्ञान म्हणजे असे शास्त्र जे मनुष्याचे कष्ट, वेळ वाचवते आणि जीवनाला गती देते. विज्ञानाने आपले जीवन अतिशय सुखमय आणि सोयीस्कर बनविले आहे. आज आपण कुठलीही गोष्ट चुटकीसरशी करू शकतो कारण प्रत्येक गोष्टीसाठी विविध यंत्र आणि उपकरणे उपलब्ध आहेत.विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन मिळायला हवे, विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हायला हवी, त्यांचे विज्ञानाप्रती आकर्षण वाढायला हवे, विज्ञानाचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत हे त्यांनी अनेक उदाहरणे देत समजून सांगितले.
यावेळी विज्ञान दिनानिमित्त ‘इंटिग्रेटेड अपरोच इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल फ्युचर ‘या विषयावर पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांकरिता पोस्टर प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना
बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शैलेंद्र देव यांनी , संचालन युगा व्यास , तर आभार पंकज उईके यांनी मानले.
यावेळी अक्षदा चेदगुलवार , भौतिकशास्त्र विभाग, प्रथम क्रमांक, अजय आकरे संगणक विभाग, द्वितीय क्रमांक , भूषण सहारे रसायनशास्त्र विभाग तृतीय क्रमांक प्रोत्साहनपर बक्षीस सायली पायाळ, संगणक विभाग , शामली पाटील ,रसायनशास्त्र विभाग, पंकज हुलके ,गणित विभाग, विशाखारोहणकर,भौतिकशास्त्र विभाग , दिपाली वागळे , भौतिकशास्त्र विभाग या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.