– दोन टप्प्यात होणार अधिवेशन
The गडविश्व
नवी दिल्ली : नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. राज्यसभेचे २५६ वे अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. सोमवारी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या सरचिटणीसांना आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरक्षित कामासाठी उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले होते.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच १ फेब्रुवारीला संसदेत आपला चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन ११ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तर अधिवेशनाचा दुसरा टप्पा १४ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.