समाज उन्नतीसाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे : पं.स माजी सभापती भास्कर तलांडे

261

The गडविश्व
अहेरी,७ ऑक्टोबर : समाज उन्नतीसाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अहेरी पं.स. सभापती भास्कर तलांडे यांनी केले.
ते अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम दामरंचा भंगारामपेठा येथे आदिवासी गोटुल समिती कडून विजयादशमी निमित्ताने आदिवासीचे आराध्य दैवत लंकापती रावण मंडावी यांच्या पूजनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला होता यावेळी उदघाटन स्थानावरून बोलत होते.
दरम्यान यावेळी सर्वप्रथम आदिवासी क्रांतीकारी वीर बाबूराव शेडमाके, बिरसा मूंडा, यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून गोंगो पूजा करण्यात आले असुन महासम्राट राजा रावण यांच्या जिलकरशाह मडावी यांच्या घरी नऊ दिवसासाठी घट मांडून पूजा अर्चान करण्यात आली होती. महासम्राट राजा रावण यांच्या पालखी मडावी यांच्या घरातून काढून पालखी घेवून भव्य दिव्य रैली काढण्यात आली व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.
त्यावेळी उदघाटन स्थानावरून बोलतांना अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे म्हणाले आज आपण विजयादशमी महोत्सव व लंकापती रावण मंडावी यांचा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत त्यानिमित्ताने सर्व समाज घटक एकत्रित आलो असून समाजाच्या उन्नतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी एकत्र राहून काम केल्यास निश्चित विकास होईल त्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच आदिवासी बांधवाना पेसा कायदा, वन हक्क कायदा, आदिवासीचे रुंढी, परंपरा, जल जंगल ज़मीन विषयी सखोल असे मार्गदर्शन करतांना सूरजागड खदाणी मुळे या भागाच्या विकास नसून विनाश होत आहे. पूँजीपतीना आर्थिक लाभ होत असून जंगलाचे खरे मालक आपण असून आपल्याला विश्वासत न घेता कोलामार्का अभयारण्य घोषित करण्यात आले. यामुळे या भागातील काही गावांना विस्थापित केले जाऊ शकतो त्यामुळे सर्वानी एकत्रित राहून लढा देने आज काळाची गरज आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून दामरंचा ग्राम पंचायतचे सरपंचा सौ.किरणताई कोडापे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच जिलकरशाह मडावी, प्रमोद कोडापे, गंगाराम गावडे, पार्वती कोडापे आदि होते.
कार्यक्रमाचे संचालन छात्रसेन तोडसाम तर आभार सूरज सिडाम यांनी केले.
सायंकाळी भोजन करून आदिवासी सांस्कॄतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मरमपली, वेलगुर, तोंडेर, कोयागुडाव परिसरातील ग्रुपनी सहभाग घेतले असून यावेळी परिसरातील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here