– भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू केल्यानंतर सरकारचा निर्णय
The गडविश्व
चंदीगढ : पंजाब सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये मोबाईल फोनच्या वापराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता पंजाबमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये नागरिक मोबाईल फोन सोबत घेऊन जाऊ शकणार आहेत. अधिकृत निवेदनानुसार, सरकारने म्हटले आहे की, लोकांना सरकारी कार्यालयांमध्ये मोबाईल फोन घेऊन जाण्याची परवानगी दिली जाईल. राज्य सरकारने गेल्या महिन्यात भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. ज्याद्वारे लोक भ्रष्टाचारात गुंतलेल्या अधिकाऱ्यांचे ऑडिओ किंवा व्हिडिओ पाठवू शकतात.
काही कार्यालयांमध्ये सर्वसामान्य जनतेला मोबाईल घेऊन येण्यास पूर्ण बंदी असल्याने त्यांना प्रचंड त्रास होत असल्याचेही सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. आता यापुढे मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी असणार नाही, मात्र ज्या कार्यालयांमध्ये हे बंधनकारक आहे, तेथे काही सुरक्षेच्या कारणास्तव या संदर्भात अंशत: बंदी लागू केली जाऊ शकते. सर्व कर्मचार्यांनी वक्तशीरपणाची खात्री करण्यासाठी सर्व प्रशासकीय सचिव, विभागीय आयुक्त आणि उपायुक्तांना मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत.