The गडविश्व
भद्रावती : सरस्वती विद्यालय मुधोली येथील शिक्षक प्रकाश उत्तमराव झाडे हे आज ३१ मार्च रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा निरोप समारंभ तथा सत्कार सोहळा कार्यक्रम सरस्वती विद्यालय आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चं.जि.मा. स. शि.स. म. चंद्रपूर श्रावण बाबू नन्नावरे, प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे अध्यक्ष आडकुजीचे गजभे, मंडळाचे सचिव सुरेश श्रीरामे आदी मंचावर उपस्थित होते.
यावेळी सरस्वती विद्यालय मुधोली व सलोरीचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व गावातील निमंत्रित पाहुणेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच सेवानिवृत्त शिक्षक झाडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पिजदुरकर, संचालन खोंड तर आभार शेख यांनी केले.