‘सर्च’ रुग्णालयात झालेल्या कर्करोग ओपीडीला उत्कृष्ट प्रतिसाद

266

The गडविश्व
गडचिरोली, १८ फेब्रुवारी : नागपूर येथील प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ. सुशील मांनधनिया यांच्या सहकार्याने ‘सर्च’ हॉस्पिटल मध्ये नियमित ओपीडीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी कर्करोग ओपीडी ठेवण्यात आलेली आहे. १६ फेब्रुवारी २०२३ ला झालेल्या कर्करोग ओपीडीचा २७ रुग्णांनी लाभ घेतला असून कर्करोग असलेल्या २७ रुग्णांवर तपासणी व उपचार करण्यात आला.
आपल्या सर्वांना माहित आहे की कर्करोग हा एक धोकादायक आजार आहे आणि तो विविध कारणांमुळे विविध प्रकारचा असू शकतो. कॅन्सर फक्त तंबाखू खाणाऱ्या किंवा चघळणाऱ्यां मध्येच होतो असे नाही तर हा आजार आता स्तनाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग आणि इतर अनेक प्रकारांमध्ये दिसून येतो.स्तनाचा रंग बदलणे, स्तन लटकणे, गाठ येणे किंवा आकार बदलणे ही सर्व स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. त्याचप्रमाणे श्वास लागणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे, स्नायू आणि हाडे दुखणे ही सर्व फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. म्हणूनच कोणत्याही संकोच न करता तुमच्या समस्येची सखोल तपासणी करण्यासाठी डॉक्टरांकडे जाणे खूप महत्वाचे आहे. सर्च येथील दवाखान्यात दर महिन्याचा ३रा गुरुवारी कर्करोग ओपीडी तपासणी व उपचारासाठी उपलब्ध असणार. तरी सर्वांनी या ओपिडी चा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन सर्चने केले आहे.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Shivratri images) (Karachi J-Hope) (Mahashivratri 2023) (Barcelona vs Man United) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here