– राज्यातील पायाभूत सुविधा, विकासासाठी भरीव तरतूद.
The गडविश्व
गडचिरोली : राज्यातील सर्व क्षेत्रांचा विचार करून शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा विकास, विद्यार्थी, महिला, बालविकास, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी बांधव, पोलिस अशा सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे असे प्रतिपादन मुंबई येथे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
त्यामुळे राज्याच्या विकासाला हातभार लागेल, नवे उद्योग येतील, रोजगार निर्मिती होईल, पर्यटन विकास होईल आणि आर्थिक सुबत्ता वाढेल. गडचिरोली जिल्ह्यातील विशेष पथकांतील कमांडोंना मिळणाऱ्या विशेष भत्त्यात वाढ केल्याबद्दल उप मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे आभार त्यांनी मानले.
सैन्य दलाच्या धर्तीवर अतिसंवेदनशील भागातील पोलिसांसाठी विशेष रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात कौशल्यविकासावर विशेष भर दिला आहे. कोविड व अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम झालेला असतानाही राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे.
अर्थ संकल्प – गडचिरोली विशेष
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा नागपूर ते भंडारा-गोंदिया,नागपूर ते गडचिरोली असा विस्तार करणार.
गडचिरोलीला नवीन विमानतळ