– स्पर्धेत ४० ते ५५ वयोगटातील महिलांचा सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, १ ऑक्टोबर : धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम अशा मुंगनेर या आदिवासी बहुल गावात ‘मुक्तिपथ मॅरेथॉन’ दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील ४० ते ५५ वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत दारूमुक्तीसाठी धाव धरली.
‘दारू व तंबाखू मुक्तीसाठी धावूया’ ही या मॅरेथॉन स्पर्धेची मुख्य थीम आहे. स्पर्धेच्या माध्यमातून गावाच्या दारू व तंबाखूमुक्तीसाठी गावातील सक्रीय युवक, महिला व पुरुष यांनी एकत्र यावे. संघटना बनवून पुढे कृती करावी, या उद्देशाने मुक्तिपथ द्वारा गावातील संघटन सदस्याच्या सहकार्याने गावोगावी स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम अशा मुंगनेर येथे गावातील ४० ते ५५ वयोगटातील महिलांनी मॅराथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवित धाव घेतली.