– जोगना ग्रापं समितीचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील जोगना जंगल परिसरात ग्रामपंचायत समिती व मुक्तीपथ तालुका चमूने मंगळवारी संयुक्त कृती करीत जवळपास ६० हजार रुपये किमतीचा सहा ड्रम मोह फुलाचा सडवा नष्ट केला.
जोगना येथे मुक्तीपथ ग्रामपंचायत समिती पुनर्गठित करण्यात आली. तसेच गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गावातील अवैध दारू विक्रेत्यांना नोटीस बजावून अवैध व्यवसाय बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान परिसरातील ठोक विक्रेता जंगल परिसरात अवैध दारू गाळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ग्रामपंचायत समितीचे सदस्य, गावातील युवक, मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्त कृती करीत जोगना जंगल परिसरात शोध मोहीम राबविली. दरम्यान दोन ठिकाणी सहा ड्रम मोहफुलाचा सडवा मिळून आला. यावेळी संपूर्ण मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या कृतीमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.