– गुरवळा जंगल सफारीतुन विद्यार्थ्यांना विविध वृक्ष प्रजाती, औषधी वनस्पती व वन्य प्राणीची दिली माहिती
The गडविश्व
गडचिरोली : आज २१ मार्च रोजी जागतिक वनदिनाचे औचित्य साधून सामाजिक वनीकरण परिक्षेत्र मार्फत कारमेल हायस्कूल गडचिरोली व शंकरराव मल्लेलवार हायस्कूल बोदली या हरितसेना शाळा मधिल प्रत्येकी २० याप्रमाणे एकूण ४० विद्यार्थी तसेच ४ शिक्षकांकरिता गुरवळा जंगल सफारी चे आयोजन करण्यात आले. गुरवळा येथील जिप्सी (वाहनाचे) साहाय्याने गाईड समावेत जवळपास ४ तास जंगल सफारी करण्यात येऊन विद्यार्थ्यांना विविध वृक्ष प्रजाती, औषधी वनस्पती व वन्य प्राणी याबाबत इत्यंभूत माहिती देण्यात आले.त्यानंतर सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडचिरोली येथील रोपवाटिका परिसरातील शेतकरी प्रशिक्षण भवनात जागतिक वन दिनाबाबत कार्यक्रम घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी धिरज यशवंत ढेंबरे यांनी विद्यार्थ्यांना जंगलाचे शास्वत संरक्षण व संवर्धन करण्याबाबत तसेच वनाचे महत्व पटवून दिले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता लिपीक नितेश सोमलकर , वनमाल राजेंद्र वासूदेव टेकाम, वनपाल निलकंठ शंकर वासेकर, वनरक्षक कु. शितल कुळसंगे, डेटा एन्ट्री ऑपरेटर मनोज पिपरे यांनी व इतर क्षेत्रीय व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.