– जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पोलीस विभाग गडचिरोली द्वारे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑगस्ट : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पोलीस विभाग गडचिरोली द्वारे सायकल मॅरेथॉन व रनिंग मॅरेथॉन चे आयोजन आज १४ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. सायकल मॅरेथॉन व रनिंग मॅरेथॉन ला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला.
सदर सायकल मॅरेथॉन गांधी चौक गडचिरोली ते जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली व रनिंग मॅरेथॉन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली ते गांधी चौक या मार्गाने करण्यात आले. सदर रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, पोलीस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, क्रीडा अधिकारी घनश्याम वराडकर, क्रीडा मार्गदर्शक एस बी बडकेलवर, विशाल लोणारे इत्यादी उपस्थित होते.
आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पोलीस विभाग #गडचिरोली द्वारे सायकल मॅरेथॉन व रनिंग मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते. सायकल मॅरेथॉन गांधी चौक गडचिरोली ते जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली #स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव pic.twitter.com/vP3BD9UUjA
— DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli) August 14, 2022