सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या गट ‘क’ व ‘ड’ ची पदभरती परीक्षा रद्द

743

– आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

The गडविश्व
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या गट ‘क’ व गट ‘ड’ ची पदभरती परीक्षा रद्द करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसे याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गाच्या २४ ऑक्टोबर २०२१ व ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी परीक्षा घेण्यात आली होती. सदर भरती परीक्षा आता रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
तसेच गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गाच्या पदभरती नव्याने घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून त्यांना नवीन परीक्षेसाठी कोणतीही शुल्क आकारण्यात येणार नाही तसेच वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी वयाची अट शिथील करण्यात आली आहे. नवीन अर्जदारांना मात्र विहीत परीक्षा शुल्क व इतर अटी लागू राहतील अशी माहीतीही आरोग्यमंत्री राजेश टोप यांनी दिली आहे. याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here