The गडविश्व
मुंबई : राज्यात एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली. पारा ४५ अंशाहून अधिक असतांना आता हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.व तापमानाचा पारा ५० अंशांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे दिसत आहे.
हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. मे महिन्यात उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. तापमानाचा पारा वाढणार असल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्व मोसमी पावसामुळे उष्णतेची लाट घटण्याचा अंदाज आहे. चंद्रपुरात १२२ वर्षांतील सर्वात उच्चांक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटांमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना आणखी काही दिवस सूर्याचा प्रकोप सहन करावा लागणार आहे.
काही ठिकाणी तर पारा ५० अंशाच्याही पुढे जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, झारखंडमधील नागरिकांना उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत.