– भाजपा सावली तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन
The गडविश्व
सावली, १२ ऑगस्ट : तालुक्यात मागील काही आठवड्यापासून पावसाने कहर माजविला असून ग्रामीण भागातील अनेक रस्ते पुरामुळे बंद झालेले आहेत. या मुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तालुक्यातील लागूनच वैनगंगा नदी असल्यामुळे गोसेखुर्द प्रकल्पाचे संपूर्ण दरवाज़े उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीला पुर आला असून तालुक्यातील नदीला लागून असलेली शेतकऱ्यांची शेती नदीच्या पुरामुळे पूर्णतः विळख्यात आली आहे. नदीकाठावरील अनेक गावात पाणी सुद्धा शिरल्यामुळे परिसरातील घरांची झड़पड़ होवून नागरिक बेघर झालेले आहेत. शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हा चिंताग्रस्त झालेला आहे. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेवून सावली तालुक्याला ओला दुष्काळ जाहिर करावा व आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे निवेदनातून तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांना करण्यात आली.
निवेदन देताना भाजपा सावली तालुका अध्यक्ष अविनाश पाल, महामंत्री तथा नगरसेवक न. पं सतीश बोम्मावार, कोषाध्यक्ष अर्जुन भोयर, प्रकाश पा गड्डमवार, कवेन्द्र रोहणकर जेष्ठ नेते, हरीष जक्कुलवार, निखील सुरमवार, दिवाकर गेडाम तुळशिदास भुरसे इतयादी उपस्थित होते.