– आत्महत्येचे कारण अस्पष्ट, गेवरा बूज येथील घटना
The गडविश्व
ता.प्र / सावली , २३ नोव्हेंबर : तालुक्यातील गेवरा बूज येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. निखिल हिवराज शेरकुरे (२१) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
मृतक युवक हा मागील एका वर्षांपासून तळेगाव एमआयडीसी मध्ये करीत होता. नुकताच तो आई वडिलांच्या भेटी करीत स्वगावी गेवरा बूज येथे होता. आज अचानक त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आत्महत्येचे करण अद्याप कळू शकते नाही. निखिल च्या आत्महत्येने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मृत्यूने गावामध्ये शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येते आहे.
पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहे.