– ना.सुधिर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार
The गडविश्व
गडचिरोली, २४ ऑगस्ट : जिल्ह्यातील सिरोंचा-आलापल्ली-आष्टी या मार्गाच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून याची दखल घेत खा.अशोक नेते यांनी भामरागडचा केलेला दौऱ्या प्रसंगी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांचा आढावा उपविभागीय अधिकारी भामरागड तसेच आलापल्ली येथील विश्रामगृहामध्ये घेण्यात आला. याप्रसंगी सिरोंचा-आलापल्ली-आष्टी रस्ता दुरुस्ती करण्यासाठी रस्त्याचा रोड टेंडर झालेला आहे परंतु काम सुरू करण्यासाठी वनविभागाची अडचणी निर्माण होत असल्याने या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी याबाबत महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्याशी चर्चा करून या संबंधित संपूर्ण माहितीचा आढावा दिल्यानंतर सिरोंचा-आलापल्ली-आष्टी या मार्गाच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामे लवकरच मार्गी लागणार असे ना. सुधिर मुनगंटीवार यांनी आश्वासन दिले.
सततच्या संतधार पावसाने व पुराच्या पाण्याने तसेच सुरजागड प्रकल्पाच्या जड वाहतुकीमुळे रस्त्यावर खुप मोठे मोठे खड्डे पडल्याने अपघात होने नाकारता येत नाही. या रोडसंबंधी लवकरच प्रश्न मार्गी लावून रोड दुरूस्तीचे काम चालु केल्या जाईल असे खा.अशोक नेते यांनी सांगितले.