सीईओ कुमार आशीर्वाद यांचा नाविण्यपूर्ण ‘फुलोरा’ उपक्रमासाठी सन्मानचिन्ह देऊन सत्कार

443

– फुलोरा उपक्रमाने जिल्ह्यातील कुपोषनाचे प्रमाण कमी
The गडविश्व
गडचिरोली, १ ऑक्टोबर : जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नाविण्यपूर्ण उत्कृष्टपणे ‘फुलोरा उपक्रम’ राबवून तसेच जिल्ह्यातील कुपोषनाचे प्रमाण कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे पुष्पगुछ तथा गौरवशाली सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नाविण्यपूर्ण ‘फुलोरा उपक्रम’ उत्कृष्टपणे राबवून गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीची बिजे पेरली तसेच जिल्ह्यातील कुपोषनाचे प्रमाण लक्षात घेता ते प्रमाण कमी करण्यांसाठी १५ वा वित्त आयोगातून बालकांना विशेष आहार उपक्रम राबविला. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण ५० टक्क्यांच्या वर कमी झाले.
याच भरीव आणि उत्कृष्ट कार्याचा गौरव ३० सप्टेबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात पुष्पगुछ तथा गौरवशाली सन्मानचिन्ह देऊन समाजभान जपणारा आदरपूर्वक सत्कार गट विकास अधिकारी धनंजय साळवे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी पंचायत समिती गडचिरोली चे गट शिक्षणाधिकारी यू. एन. राऊत, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीमती पतकमवार, विस्तार अधिकारी शिक्षण एन. एस. कुमरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी एफ एस लांजेवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here