– पूना नार्कोम मोहिमेस यश, ३ नक्षल्यांवर प्रत्येकी एक लाखाचे होते बक्षीस
The गडविश्व
सुकमा : जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या पूना नार्कोम मोहिमेस यश मिळत असून चार महिला नक्षलींसह १९ नक्षल्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. नक्षल्यांच्या विरोधात पोलिसांचे हे मोठे यश आहे. यामुळे नक्षली संघटनेला जबर धक्का बसलेला आहे.
सुकमा जिल्ह्यातील भेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय ४ महिलांसह १९ नक्षलींनी आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या तीन नक्षल्यांवर छत्तीसगड सरकारने १-१ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
पोलिसांकडून नक्षल्यांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. कारवाईच्या भीतीने अनेक नक्षली आत्मसमर्पण करत आहेत. जिल्हा पोलिसांद्वारे राबविण्यात येत असलेल्या पूना नार्कोम मोहिमेमुळे प्रभावित होऊन नक्षल्यांनी सीआरपीएफ २१९ वाहिनी कोबरा, कोब्रा, २०४ वाहिनी, ५० वी वाहिनी आणि झिलबाल पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या सर्व नक्षलींना छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन योजनांचा लाभ दिला जाणार आहे.