सुरजागड लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रक च्या धडकेत महिला जखमी

924

The गडविश्व
एटापल्ली, १० सप्टेंबर : जिल्हयातील सुरजागड येथील लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रक च्या धडकेत महिला जखमी झाल्याची घटना घडली. कमला चंदु वेलादी (३६) रा. तुमगुंडा असे अपघात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली जिल्हयातील सुरजााड पहाडीवर लोहखनिज उत्खननाचे काम सुरू आहे. दररोज अवजड वाहनाने लोहखनिजाची वाहतुक केल्या जात आहे. एटापल्ली पासून तीन किमी अंतरावर असलेल्या तुमगुंडा येथील कमला चंदु वेलादी ही महिला ही ८ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास सार्वजनिक नळावरून पिण्याचे पाणी भरत होती. दरम्यान पाणी घेवून रस्ता ओलांडतांना सुरजागड पहाडीवरून लोहखनिजाची वाहतुक करणाऱ्या ट्रक ने त्यांना जबर धडक दिली. यात कमला वेलादी यांच्या डोक्याला व हाताला मार लागून जखमी झाल्या. अपघाताची माहिती होताच नातेवाईकांनी त्यांना रूग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. उपचारानंतर कमला वेलादी यांची प्रकृती स्थिर आहे.
सुरजाड येथील लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रकमुळे अनेकवेळा अपघात घडत आहेत. तसेच या ट्रकमुळे रस्त्यांची चाळण झालेली असून धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना करावा लागत असून लोहखनिजांची वाहतुक दिवसा बंद ठेवण्यात यावी या मुख्य मागणीसह इतर मागण्या संदर्भात आष्टी, अनखोडा व मार्कंडा कंसोबा ग्रामपंचायतीने ठराव घेवून याविरोधात कारवाई करण्यासाठी आष्टी पोलीस ठाण्याला निवेदन दिले आहे.

अपघातग्रस्त महिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here