सुरजागड लोहखनिज प्रकल्प नागरिकांच्या जिव्हारी : लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रकची एसटी बसला जबर धडक

2359

– जिवीतहाणी टळली, एसटी बसचे मोठया प्रमाणात नुकसान

The गडविश्व
गडचिरोली, ६ सप्टेंबर : सुरजागड (surjagad) पहाडीवर सुरू असलेल्या लोहखनिज उत्खनन पुन्हा नागरिकांच्या जिव्हारी उठले आहे. लोहखनिजांची वाहतुक करणाऱ्या ट्रकची एसटी बसला जबर धडक बसून अपघात (bus accident)  झाल्याची घटना आज मंगळवार ६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आलापल्ली नजीक घडली. नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात कोणतीही जिवीतहाणी झाली नसली तरी एसटी बसचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
अहेरी (aheri) आगारातून एम एच ४० ए क्यू ६०९४ क्रमांकाची बस आलापल्ली-एटापल्ली मार्गे गडचिरोलीला (gadchiroli) प्रवासी घेवून जात असतांना सुरजागड येथून लोहखनिजाची वाहतुक करणाऱ्या ओडी ०९ जी ०८५५ क्रमांकाच्या ट्रकने समोरून जबर धडक दिली. सुदैवाने अपघातात कोणतीही जिवीतहाणी झाली नसली तरी बसच्या समोरील भाग पूर्णतः अस्थाव्यस्त झाला असून एसटी महामंडळाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात होताच बसमध्ये असलेले प्रवासी घाबरून खाली उतरले. अपघात स्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. तर अपघातातील ट्रक चालक सर्वांची माफी मागतांनाही दिसून आले.
सुरजागड लोहखनिज प्रकल्पात अनेक मोठमोठया ट्रकव्दारे लोहखनिजाची वाहतुक केली जाते. या लोहखनिज प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध असतांनाही लोहखनिज प्रकल्प सुरू करण्यात आले. यापुर्वीही लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रकमुळे मोठे अपघात झाले आहेत तसेच काहींना आपला जिवही गमवावा लागला आहे. नेहमीच या मार्गावर ट्रक ची वर्दळ असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते मात्र याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होतांना दिसत आहे. मागील काही दिवसाअगोदर याच ट्रकच्या कोंडीमुळे रूग्णवाहीकेस अडथळा निर्माण झाला होता व साईड मिळणे कठिण झाले होत याबाबत सोशल मिडीयावर विडीओ वायरल झाले आहे. तसेच जड वाहतुकीमुळे आष्टी-आलापल्ली मार्गाची अक्षरः चाळण झाली असून रेपनपल्ली जवळील रस्त्यावरील खड्डे चक्क लोहखनिजाने बुजविले होते. लोहखनिज वाहतुक करणारे वाहन भरधाव वेगाने जात असल्याने प्रवाशांना जिव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. भविष्यात मोठा अपघात होण्याचेही शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here