– धानोरा तालुक्यातील लेखा गावाजवळील घटना
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १७ ऑक्टोबर : सुरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणारा ट्रक धानोरा तालुक्यातील लेख गावनाजीकच्या शेतात शिरल्याची घटना !६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास घडली.
गडचिरोली- धानोरा हा राष्ट्रीय महामार्गा असुन या मार्गावरन छत्तीसगढ राज्यात जाणाऱ्या एमएच ३४ बिजी ७७०१ क्रमांकाच्या ट्रक चालकाचे लेखा गावानजीक नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव ट्रक हे डाव्या बाजूच्या शेतात शिरले. आज सायंकाळपर्यंत ट्रक बाहेर निघाले नव्हते. मागील काही दिवसांपूर्वी त्याचा ठिकाणी मुख्य रस्त्यावर दोन ट्रक फसले होते.त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती.
सुरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक ने अनेक वेळा लहान मोठे अपघात झाले. ट्रक चालक भरधाव वेगाने चालवत असल्याने विविध अपघात घडले. मात्र सुरजागडच्या ट्रकची अपघाताची शृंखला मात्र संपता संपेना. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी भरधाव वेगाने ट्रक जात असल्याने अशे अपघात वारंवार घडत आहे.