सोनल भोयर यांना आचार्य पदवी प्रदान

487

The गडविश्व
गडचिरोली : महात्माह गांधी विज्ञान व कला महाविद्यालय आरमोरी येथील संशोधन केंद्र अंतर्गत संशोधक विद्यार्थीनी सोनल वामनराव भोयर यांना गणित विषयात ‘Some Mathematic Aspects of Thermoelasticity Study of Solid Object’ या शिर्षकावर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.
या संशोधनाकरिता महात्मा गांधी विज्ञान व कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांचे मार्गदर्शन लाभले.
आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मागदर्शनक प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा तसेच पती संदिप प्रधान, यदाक्षी प्रधान, सासरे शामराव प्रधान, सासू सौ. रंजना प्रधान, वडील वामनराव भोयर, आई सौ. जयमाला भोयर, राजेंद्र प्रधान, सौ.शितल प्रधान, निलेश पाटील, बहीण सौ. शितल पाटील, तथा भाउ अनुराग यांना दिले आहे. तसेच त्यांचे स्वकीय आप्त वासीयांकडून सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here