सौदी अरेबिया सरकारने नागरिकांना भारतासह इतर पंधरा देशांमध्ये प्रवासावर घातली बंदी

339

The गडविश्व
सौदी अरेबिया : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सौदी अरेबिया सरकारने आपल्या नागरिकांना परदेशात प्रवास करण्यावर बंदी घातली आहे. सध्या कोरिया सह अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला आहे. सौदी अरेबियाने नागरिकांना भारतासह इतर पंधरा देशांमध्ये प्रवासावर बंदी घातली आहे.
भारताव्यतिरिक्त लेबनॉन, सीरिया, तुर्की, इराण, अफगाणिस्तान, येमेन, सोमालिया, इथिओपिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, लिबिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, आर्मेनिया, बेलारूस आणि व्हेनेझुएला या देशांमध्ये प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे . दरम्यान शनिवारी सौदी सरकारच्या पासपोर्ट महासंचालनालयाने प्रवास बंदीची सूचना दिली आहे.
सौदी अरेबियाच्या नागरिकांनी या देशात प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे परंतु भारतीय नागरिकांना सौदी अरेबियात प्रवेश करण्यास बंदी घातली जाईल का नाही याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. दरम्यान कोरियासहित इतर देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here