– गिरोला (चातगाव) येथे शिवजयंती निमित्त रनिंग स्पर्धा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना सातत्य व संयम आवश्य असणे आवश्य आहे असे प्रतिपादन स्वप्नील सर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे स्वप्नील मडावी यांनी केले.
आज शिवजयंती निमित्त गिरोला (चातगाव) येथे संगम सामाजिक संस्थांच्या वतीने रनिंग स्पर्धा व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होत याप्रसंगी ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त आज विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गडचिरोली पासून नजीकच असलेल्या गिरोला (चातगाव) येथे संगम सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त रनिंग स्पर्धा व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होेते. यावेळी कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून डॉ. मिलींद नरोटे, प्रमुख अतिथी म्हणून चातगांवचे प्रभारी पोनि पाटील, स्पर्धा परिक्षेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वप्नील सर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र इंदिरानगरचे स्पप्नील मडावी हे होते तसेच बावणे, सुत्रपवार, जयश लोंढे आदी उपस्थित होते. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्राची सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला सकाळच्या सुमारास रनिंग स्पर्धा घेण्यात आली त्यांनतर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन घेण्यात आले व समारोप रनिंग स्पर्धेचे बक्षीस वितरण करून करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास मडावी, संचालन खोब्रागडे, तर अभार अविनाश हलामी यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेच्या सर्व सभासदांचे सहकार्य लाभले.