The गडविश्व
गडचिरोली, ३० सप्टेंबर : पंचायत समिती गडचिरोलीच्या वतीने “स्वच्छताही सेवा व सेवा पंधरवाडा” अंतर्गत गावांच्या दुष्यमान स्वच्छतेची राष्ट्रव्यापी मोहिम राबविण्यात येत आहे. ही सेवा राबविण्याच्या अनुषंगाने पंचायत समिती, गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली येथील प्रसिद्ध सेमाना देवस्थान येथे स्वच्छता मोहिम श्रमदानाच्या माध्यमातून राबविण्यात आली. सदर उपक्रम एफ.आर.कुत्तीरकर, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता जिल्हा परीषद, गडचिरोली यांचे प्रमुख अध्यक्षतेखाली व ङि एस. साळवे गट विकास अधिकारी पंचायत समिती, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले. यावेळी स्थानीक पंचायत समिती, गडचिरोली येथील सर्व अधिकारी /कर्मचारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे कर्मचारी तसेच ग्रामपंचायत मुडझा व वाकडी येथील सरपंच, सचिव, ग्रामपंचायत कर्मचारी व नागरीक तसेच तालुका ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष श्री.बनपुरकर, सचिव शिवनकर प्रामुख्याने उपस्थित होते.
सेमाना देवस्थान हे गडचिरोली तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असून बहुसंख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. परंतु आल्यानंतर जेवनाचा किंवा विविध कार्यक्रम केल्यानंतर या ठिकाणी प्लास्टीकचा वापर केला जातो. सदर बाब योग्य नसुन, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सींगल युज प्लास्टीक बंद करणे अपेक्षित आहे. ताशा सुचना कुत्तीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली यांनी सेमाना ट्रस्ट कमेटी यांना दिल्या व देवस्थान हे पवित्र, शुद्ध व स्वच्छ असले पाहीजे असे आवाहन जनतेस केले. स्वच्छता मोहिमेत उत्सफूर्तपणे पंचायत समिती, गडचिरोली येथील अधिकारी/कर्मचारी यांनी सहभाग नोंदवून साधारणतः तिन तास स्वच्छता केली यावेळी किमान ५५ किलो प्लास्टीक गोळा करुन मुरखळा, गडचिरोलीच्या डंपींग यार्ड मध्ये टाकण्यात आले. व परीसर स्वच्छता करण्यात आली. सदर उपक्रमाच्या योजनार्थ पी.पी.पदा, कृषी अधिकारी, कु.पातकमवार मॅडम, कक्ष अधिकारी, ङि ङि मदनकर लेखाधिकारी लांजेवार, अमोल भोयर, विस्तार अधिकारी पंचायत. प्रदिप बरई समन्वयक, कु.कुमुद अ.शेबे, राहुल दिवटे, ग्रामसेवक देवेंद्र मच्छेवार, वायबसे इ.नी आयोजनार्थ महत्वाची भुमिका बजावली. असे गट विकास अधिकारी, पंचायत समिती, गडचिरोली यांनी कळविले आहे.