स्वयंरोजगार मेळावा व शेतकऱ्यांना स्प्रेअर पंप वाटप

189

– गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, २२ ऑगस्ट : जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांकरीता स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल, बीओआय स्टार आरसेटी स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, गडचिरोली, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा “स्वयंरोजगार मेळावा” व शेतकऱ्यांना स्प्रेअर पंप वाटप कार्यक्रम १८ ऑगस्ट २०२२ रोजी पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य धाम येथे पार पडला.
सदर स्वयंरोजगार मेळाव्यास दुर्गम-अतिदुर्गम भागातील १०० प्रशिक्षणार्थी युवक-युवती व शेतकरी उपस्थित होते. यावेळी मत्स्य व्यवसाय पुर्ण केलेल्या २७ प्रशिक्षणार्थ्यांना ०२ किलो मत्स्य बीज, ०५ किलो मत्स्य खाद्य व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच ३४ शेतकऱ्यांना प्रत्येकी ०१ नग स्प्रेअर पंप वाटप करण्यात आले. तसेच बीओआय स्टार आरसेटी, गडचिरोलीच्या मार्फतीने घेण्यात येत असलेल्या विविध प्रशिक्षकांचे सत्कार करण्यात आले.
आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ४८४, नर्सिंग असिस्टंट ११४३, हॉस्पीटॅलीटी ३०५, ऑटोमोबाईल २५४, इलेक्ट्रीशिअन १४२, प्लम्बींग २७, वेल्डींग ३३, जनरल ड्युटी असिस्टंट १०३, फील्ड ऑफीसर ११ तसेच व्हीएलई ५२ असे एकुण २५५४ युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
तसेच कृषी विज्ञान केंद्र, तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १०५, मत्स्यपालन ६०, कुक्कुटपालन ४४४, बदक पालन १००, शेळीपालन ८०, शिवणकला १८७, मधुमक्षिका पालन ३२, फोटोग्राफी ३५, टु-व्हिलर दुरुस्ती प्रशिक्षण-६४, भाजीपाला लागवड ४४०, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण ७८०, फास्ट फुड ६५, पापड लोणचे ३०, दु/फोर व्हिलर प्रशिक्षण ३९० एमएससीआयटी- २०० असे एकुण ३०१२ युवक युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे. यावेळी अपर पोलीस अधीक्षक, (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक, (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी अनुज तारे सा. यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपले मार्गदर्शनात सांगितले की, गडचिरोली जिल्हयातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असून, नेहमी तुमच्या पाठीशी राहील, गडचिरोली पोलीस दलामार्फत पोस्टे/उपपोस्टे / पोमकेंच्या ठिकाणी पोलीस दादालोरा खिडकीला भेट देवून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील रोजगाराच्या बाबतीत अवगत करून त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या कुटूंबियांचे राहणीमान उंचवावे. असे मनोगत व्यक्त केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक, (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक, (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी अनुज तारे सा. व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मल्लीकार्जुन (शास्त्रज्ञ) राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, राहुल दमाले (शास्त्रज्ञ) राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, ज्ञानेश्वर ताथोड विषय विशेषतज्ञ, (कृषी अभियांत्रिकी) कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, चेतन वैद्य संचालक, बीओआय स्टार आरसेटी गडचिरोली हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा स्वप्निल जाधव व उपविभाग धानोरा अंतर्गत असलेले सर्व पोस्टे / उपपोस्टे / पोमकेचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here