– २६ रक्तदात्यांनी पुढाकार घेत केले रक्तदान
The गडविश्व
गडचिरोली : स्वयं रक्तदाता जिल्हा समितीच्या वतीने आज ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचीत्य साधून आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीरात २६ रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.
रक्तपेढीतला रक्ताचा तुटवडा बघता स्वयं रक्तदाता जिल्हा समितीच्या वतीने ठिकठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबीरांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून अनेक रक्तदाते पुढे सरसावत रक्तदान करीत आहे.
आज इंजेवारी येथे झालेल्या रक्तदान शिबीरात विलास ठाकरे, संजय दुधबळे, प्रकाश खोब्रागडे, आतीश उपरिकर, नवनाथ दाणे, इंगलेश बांबोळे, अंकुश दुमाने, गुणवंत कभले, धिरज हाडगे, अनिल रामटेके, उमेश पात्रीकर, देवेंद्र उपरिकर, कुमदेव पिंपळे, मंगेश पासेवार, गणेश हाडवे, भिमरावर माटे, चेतन पात्रीकर, मृगल कुमरे, अक्षय ठाकरे, नितीन किरणापूरे, विलास खांडपुरे, देविदास दाणे, धनंजय मदनकर, प्रतिक भुरसे, तुषार मोटघरे, तनमय आडखुरे या २६ रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.रक्तदान शिबीराला समितीचे अध्यक्ष चारूदत्त राऊत, उपाध्यक्ष निशीकांत नैताम, डॉ. किरणापुरे, गुणवंत कथालेख धिरज हडगे, दर्शन चंदनखेडे, प्रफुल खापरे, सुरज पडोळे, धनंजय आकरे, इशांत ठाकरे, युवा मंडळी व गावातील महिला मंडळ तसेच गावकरी यांचे सहकार्य लाभले.
तसेच जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चंदाताई राऊत तर उद्घाटक म्हणून PSI कांचन उईके मॅडम, आरमोरी पोलीस स्टेशनचे PI काळबांधे तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामसेविका कुमरे मॅडम, ग्रामसेविका रामटेके, कुंघाळकर मॅडम, डॉ. के. किरणापूरे सर उपस्थित होते.