The गडविश्व
वर्धा : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकारणाचा आज निकाल लागला. अखेर आज न्यायालयाने सदर प्रकारणाचा निर्वाळा देत आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज मृतक अंकिता हिची दुसरी पुण्यतिथी आहे. आज पुण्यतिथीच्या दिवशी कोर्टाने निकाल दिल्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
हिंगणघाट जळीत हत्याकांड प्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. काल बुधवारी न्यायालयाने आरोपीला हत्येच्या गुन्ह्यात दोषी मानले होते. आज झालेल्या सुनावणीत आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला जन्मठेपेचीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.