The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील हिरापूर येथील एका घरातून देशी दारूच्या २० निपा जप्त करीत विक्रेत्यावर गुन्हा दाखल केल्याची कारवाई मुक्तिपथ व गडचिरोली पोलिसांनी संयुक्तरित्या केली.
हिरापूर येथे गाव संघटनेच्या पुढाकारातून अवैध दारूविक्री बंद होती. तसेच गावात दारूबंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी गाव संघटना विशेष प्रयत्न करीत आहे. मात्र, गावातील दोन मुजोर दारू विक्रेत्यांनी संघटनेला न जुमानता आपला अवैध व्यवसाय सुरु केला होता. गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने गावातील नितेश जेंगठे या विक्रेत्याच्या घराची तपासणी केली असता, देशी दारूच्या २० निपा आढळून आल्या. संपूर्ण मुद्देमाल गडचिरोली पोलिसांनी जप्त करीत सदर विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस हवालदार शिवदास दुर्गे यांनी केली. यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवणाथ मेश्राम उपस्थित होते.