The गडविश्व
अहेरी, १६ ऑगस्ट : स्थानिक होमगार्ड कार्यालयातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त काल १५ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा समादेशक होमगार्डस गडचिरोली तथा अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काल १५ ऑगस्ट २०२२ ला प्रभारी अधिकारी एस.एल.सिडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडण्यात आले. त्यानंतर माजी प्रभारी अधिकारी एम.आर.खान यांच्या उपस्थितीत कार्यालयाच्या पटांगणात वृक्षारोपण कार्यक्रम, मोटार सायकल तिरंगा रॅली कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी जे.जी.काझी, आर.एन.कोसरे व पुरूष व महिला होमगार्ड सैनिक उपस्थित होते.