– नागपुर येथील तज्ज्ञ डॉ. विरेश गुप्ता यांच्याकडून उपचार
The गडविश्व
गडचिरोली, ६ सप्टेंबर : माँ दंतेश्वरी दवाखाना या ठिकाणी विविध ओपीडी शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. प्रत्येक महिन्याला विविध आजारांच्या निवारणासाठी माँ दंतेश्वरी दवाखाना येथे ओपीडी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. दरम्यान प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी माँ दंतेश्वरी दवाखाना येथे मूत्रपिंड ओपीडी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. तरीही परिसरातील नागरिकांनी या ओपीडी शिबीराकरिता सर्च स्थित माँ दंतेश्वरी दवाखाना येथे येऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात येत असलेल्या धानोरा तालुक्यातील चातगाव येथे असलेल्या “सर्च” येथील माँ दंतेश्वरी दवाखाना येथे मागील ३० वर्षांपासून आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. अशातच माँ दंतेश्वरी दवाखाना येथे विविध ओपीडी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. दरम्यान शनिवार १० सप्टेंबर रोजी याठिकाणी मूत्रपिंड ओपीडी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लघवीत रक्त येणे, अनेक वर्ष मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असणारे रुग्ण, अनियंत्रित रक्तदाब, पायावर, चेहऱ्यावर किंवा शरीरावर सूज, लघवी कमी होणे, डायलिसीसीसवर असणारे रुग्ण, लघवीला झालेला जंतुसंसर्ग, अशाप्रकारची जर लक्षणे आढळत असतील तर या ओपीडीचा लाभ नक्कीच घ्यावा. नागपुर येथील तज्ज्ञ डॉ. विरेश गुप्ता यांची विशेष उपस्थिती या मूत्रपिंड ओपीडी शिबीराकरिता असणार आहे.
गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागातून मुंबईला जाऊन कोणत्याही आजारावर उपचार घेणे हे अशक्यच! म्हणूनच माँ दंतेश्वरी दवाखाना येथे या विशेष ओपीडी सुरु करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर सारख्या ठिकाणी कोणत्याही दवाखान्यात जायचे म्हटले तर भरमसाठ लागणारा खर्च, राहण्याची व्यवस्था, अशा विविध समस्यांचा सामना रुग्णाला करावा लागतो. या सर्व समस्यांचा विचार करून, रुग्णांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून जवळ असलेल्या रुग्णालयात या मुंबई, पुण्याच्या डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध करून देण्यात आला आहे. माँ दंतेश्वरी दवाखाना याठिकाणी हि व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. तरीही येत्या शनिवारी म्हणजेच १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी या शिबीराकरिता नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी या ओपीडी शिबिराचे आयोजन करण्यात येईल याचीही नोंद घ्यावी.