– 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्यास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दिली मान्यता
The गडविश्व
नवी दिल्ली : देशात 15 ते 18 वयोगटातील अल्पवयीन मुलामुलींचे कोरोना लसीकरण सुरु आहे. कोविन पोर्टलनुसार, आतापर्यंत 3,45,35,664 जणांना लसींचा पहिला डोस देण्यात आला आहे. या वयोगटात सुमारे साडेसात कोटी मुले आहेत. 15 ते 17 वयोगटातील मुलांमध्ये वेगाने लसीकरण होत असून फेब्रुवारी अखेरीस लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर 12 ते 14 वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू करता येईल.
भारतातील 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्यास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सीन 12 ते 18 वर्षे वयोगटात दिली जाऊ शकते. सध्या ही लस 15 ते 17 वयोगटाला दिली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एनटीजीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चपर्यंत 15 ते 17 वयोगटातील बालकांचे लसीकरण झाल्यानंतर 12 ते 14 वयोगटातील बालकांचे लसीकरणही सुरू होऊ शकते आणि त्यासाठी लस उपलब्ध करून दिली जात आहे. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समिती बैठकीत लसीकरणाबाबत निर्णय घेईल.