The गडविश्व
चंद्रपूर, १२ ऑक्टोबर : “डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसीएशन ऑफ इंजिनियर्स (बानाई), चंद्रपुर” शाखेच्या वतीने, समाजाच्या उन्नती व प्रबोधनासाठी वर्षभरात अनेक कार्यक्रम आयोजित करीत असते त्या अंतर्गत अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिनार्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी माहिती केंद्र चालविणे, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना दर वर्षी शिष्यवृती वाटप करणे, अत्यल्प दरात आंबेडकरी विचार धारेच्या पुस्तकांचे वाटप करणे. असे अनेक समाजभीमुक कार्यक्रम बानाई संगटनेच्या मार्फत राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून या वर्षी सुद्धा धम्म-चक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्याने बुद्ध-भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
बोधी फाऊंडेशन नागपुर प्रस्तुत “शिल्पकार जीवनाचा” हा बुद्ध-भीम गीतांचा सुरेल अविस्मरणीय नजराणा रसिक श्रोत्यांचा मनोरंजांनासाठी व प्रबोधनासाठी शुक्रवार १४ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, मेन रोड, चंद्रपुर येथे सायंकाळी ६:०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसीएशन ऑफ इंजिनियर्स (बानाई), चंद्रपुर मार्फत आयोजित करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ. अनिल हिरेखन, कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली असून कार्यक्रमाचे विशेष आकर्षण सुर नवा ध्यास नवा या कलर्स मराठी वाहिनीवरील २०२२ चे विजेता उत्कर्ष वानखेडे आहेत. यांच्या सोबतीला प्रसिद्ध गायिका आकांशा नगरकर-देशमुख, प्रसिद्ध गायक विरेंद्र बोराडे, कार्यक्रमाचे संगीत संयोजक प्रसिद्ध संगीतकर भूपेश सवाई आहेत. कार्यक्रमाचे निवेदन अर्चना-ललित नागपुर यांचे असून निवेदनाच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचे प्रबोधन होणार आहे.