– चामोर्शी पोलिसांची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली : चामोर्शी पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने गुरुवारी संयुक्त कारवाई करीत १६ हजार रुपये किंमतीची अवैध दारु जप्त केली. याप्रकरणी शहरातील दोन दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वार्ड क्रमांक ४ मध्ये जवळपास सहा दारूविक्रेते सक्रिय असून होळीनिमित्त मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री केली जात असल्याची माहिती चामोर्शी पोलिसांना मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे चामोर्शी पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने वार्डातील चार घरांची तपासणी केली. दरम्यान ताराचंद उंदीरवाडे या विक्रेत्याकडे १०० देशी दारूचे टिल्लू किंमत १० हजार व संदीप कवठे याच्या घरात ६ हजार रुपये किंमतीची ३० लिटर मोहफुलाची दारू मिळून आली. असा एकूण १६ हजार रुपये किंमतीची अवैध दारू जप्त करीत दोन्हीं विक्रेत्यांवर चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक व मुक्तिपथ तालुका चमूने केली.