१७४ बेरोजगारांना गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन मिळाला रोजगार

891

– स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पर्वावर “भव्य महारोजगार मेळाव्याचे” आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, ६ ऑगस्ट : जिल्हयातील गरजु युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेच्या वतीने आज ०६ ऑगस्ट २०२२ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतीकरीता गडचिरोली पोलीस दल व ॲडव्हॉस ग्रुप फॅसिलिटी ॲन्ड सिक्युरिटी मॅनेजमेंट सर्विसेस प्रा.लि. हैद्राबाद, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन राळेगाव व अहमदनगर, मेहमूदा शिक्षण व महिला ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “भव्य महारोजगार मेळाव्याचे” आयोजन पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे करण्यात आले.
या महारोजगार मेळाव्यात दुर्गम-अतिदुर्गम भागातील विविध प्रकारच्या स्वयंरोजगार प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ३०० बेरोजगार उमेदवार सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित उमेदवारांमधुन ॲडव्हॉस ग्रुप फॅसिलिटी ॲन्ड सिक्युरिटी मॅनेजमेंट सर्विसेस प्रा.लि. हैद्राबाद यांचे मार्फत सुरक्षा रक्षक- ४१, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन राळेगाव व अहमदनगर यांचे मार्फत नर्सिंग असिस्टंट ६६, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन राळेगाव व अहमदनगर यांचे मार्फत हॉस्पिटॅलिटी- १२, आटोमोबाईल २९, इलेक्ट्रीशिअन – २१, मेहमूदा शिक्षण व महिला ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था, नागपूर यांचे मार्फत वेल्डींग- ०५ अशा एकुण १७४ उमेदवारांची निवड प्रशिक्षणाकरीता करण्यात आली. प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले. विविध प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या उमेदवारांचे मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल साो. यांनी कौतुक केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना मा. पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असून, नेहमी तुमच्या पाठीशी राहील, आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील रोजगाराच्या बाबतीत अवगत करून त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या कुटूंबियांचे राहणीमान उंचवावे, असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.आज पर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडून रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ४८४, नर्सिंग असिस्टंट ११४३, हॉस्पीटॅलिटी ३०५, ऑटोमोबाईल २५४, इलेक्ट्रीशिअन १४२, प्लंम्बींग २७, वेल्डींग ३३, जनरल डयुटी असिस्टंट १०३, फील्ड ऑफीसर ११ व व्हीएलई ५२ असेएकुण २,५५४ युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १०५ मत्स्यपालन ६० कुक्कुटपालन ४५७, बदक पालन १५१, शेळीपालन ८०, शिवणकला १३७, मधुमक्षिका पालन ३२, फोटोग्राफी ३५, भाजीपाला लागवड ५४०, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण ७८०, टु व्हिलर दुरुस्ती ३४, फास्ट फुड ३५, पापड लोणचे ३०, टू/फोर व्हिलर प्रशिक्षण ३७०, एमएससीआयटी २०० असे एकुण ३०१२ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर महारोजगार मेळाव्याचे कार्यक्रमास पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा., अपर पोलीस अधीक्षकसमीर शेख (प्रशासन), अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे (अभियान), अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे सा. हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार व अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here