– चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकार होणार सहभागी
The गडविश्व
गडचिरोली, १८ नोव्हेंबर : प्रसिद्धी माध्यमांचे भविष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिजिटल मिडिया पत्रकारांचे दोन दिवसीय अधिवेशन १९ व २० नोव्हेंबर रोजी मुल तालुक्यातील चीतेगाव येथे डिजिटल मिडिया असोसिएशन व डिजिटल मिडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया च्या संयुक्त माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे.
डिजिटल मिडिया म्हणजेच न्युज पोर्टल आज माध्यमांच्या दुनियेत क्रांती करीत असुन जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटना तत्काळ जनतेपर्यंत पोहचविण्याचे मोलाचे कार्य ह्या माध्यमातून सुरू असून केंद्र शासनाने डिजिटल मिडीयाला मान्यताही दिली आहे. अनेक राज्यात शासकीय जाहिराती अधिकृतपणे न्युज पोर्टलला देण्याचे आदेशही निघाले आहे मात्र पुरोगामी व प्रगतिशील असलेल्या महाराष्ट्र राज्यात डिजिटल माध्यमांना अजूनही जाहिराती देण्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.
माध्यमात कार्य करताना डिजिटल मिडिया प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणी, पत्रकारिता कायदे तसेच बातम्यांचे अचुक व सुयोग्य विश्लेषण करण्याच्या संदर्भात पत्रकारांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने डिजिटल मिडिया असोसिएशनने संयुक्तपणे हे निवासी अधिवेशन आयोजित केले असुन अधिवेशनाच्या माध्यमातून डिजिटल मिडीयाचे अस्तित्व व महत्व प्रभावीपणे पटवून देणे, पत्रकारांचे मजबूत संघटन तयार करणे तसेच डिजिटल पत्रकारांना प्रशिक्षण देणे हा ह्या अधिवेशनाचा मुख्य उद्देश आहे.
दोन दिवसीय अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणुन नागपुर उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधीज्ञ ॲड फिरदौस मिर्झा उपस्थित राहणार आहेत तर नागपुर खंडपीठाचे जेष्ठ विधीज्ञ ॲड आनंद देशपांडे मुख्य अतिथी असतील. अधिवेशनात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्याकरिता ॲड.डॉ कल्याणकुमार, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, आनंद आंबेकर, ॲड. फराद बेग, झी टीव्ही चे प्रतिनिधी आशिष अंबाडे, दैनिक नवराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत विघ्नेश्वर, ई टीव्ही भारत चे प्रतिनिधी अमित वेल्हेकर व ज्येष्ठ सामजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी उपस्थित राहणार आहे. तसेच देवनाथ गडाटे डिजिटल मीडिया च्या पोर्टल धारकांना मार्गदर्शन करणार आहे. या वेळी डिजिटल मीडिया चे सर्व पत्रकार उपस्थित राहणार आहेत अशी माहिती डिजिटल मिडिया असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया ह्यांनी दिली आहे.
#digital media #digital #media #adhiveshan #digitalmediaadhiveshan #chandrpurnews #mul #chitegao #elgarpratisthan #jitendrchordiy #devnathgandate #digitalmediaportal