२० जणांनी दारुमुक्त होण्यासाठी घेतला उपचार

320

The गडविश्व
गडचिरोली : दारूच्या व्यसनी रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी एटापल्ली तालुक्यातील रेंगेवाही व कुरखेडा तालुक्यातील लक्ष्मीपुर येथे व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून एकूण 20 रुग्णांनी उपचार घेतला.
रेंगेवाही येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार क्लिनिकचे अयोजन करण्यात आले होते. यावेळी 13 रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. रुग्णांची केस हिष्ट्री पूजा येलूरकर यांनी घेतली तर साईनाथ मोहूर्ले यांनी रुग्णांना समुपदेशन केले. क्लिनिकचे नियोजन व व्यवस्थापन तालुका संघटक किशोर मलेवार व तालुका प्रेरक रवी वैरागडे यांनी केले. यशस्वीतेसाठी सरपंच रीना कूळहेटी, गाव संघटन सदस्य माधव मोहंदा, राजू मडावी यांनी सहकार्य केले. लक्ष्मीपुर येथील शिबिरात 7 रुग्णांवर उपचार करण्यात आले. प्राजु गायकवाड यांनी दारूची सवय कशी लागते, दुष्परिणाम व धोक्याचे घटक सांगत समुपदेशन केले. प्रभाकर केळझरकर यांनी केस हिष्ट्री घेतली. शिबिराचे नियोजन तालुका संघटक मयूर राऊत व उपसंघटक विनोद पांडे यांनी केले. दोन्ही शिबिराच्या माध्यमातून 20 रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्धार केला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here