२० जून रोजी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

335

The गडविश्व
गडचिरोली : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी/ अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राबविण्यात येते. दि.20 जून 2022 ला सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय, धानोरा येथे तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केलेला आहे. तरी समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी लेखी अर्ज/ तक्रारीसह उपस्थित रहावे असे तहसिलदार तथा अध्यक्ष तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन समिती, धानोरा, महेंद्र गणविर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here