– विविध क्रीडा, नृत्य, खाद्य स्पर्धांचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली : भामरागड तालुका हा संपुर्णपणे घनदाट जंगलाने व्याप्त तालुका असुन औद्योगिकरणापासुन कोसो दुर अंतरावर आहे. तालुक्यामध्ये विविध जातीचे वृक्ष, पक्षी, जंगली श्वापदे असुन पर्यटनाकरीता आवश्यक असलेले डोंगर-नद्यांनी व्याप्त प्रदेश आहे. निसर्गाची तालुक्यावर एवढी मेहरनजर असुन देखील तालुक्यातील सुमारे 90 टक्के लोकसंख्या असलेले माडिया व गोंड या आदिवासी समाजाचे जीवनमान अजुनही मागास आहे. तालुक्यातील आदिवासी कुटुंबांचे जीवनमान उंचावणे करीता तसेच बाहेरील जगाला भामरागड तालुक्यातील विविध आदिवासी संस्कृती तसेच आदिवासी समाजातील चालीरीती, लोकनृत्य येथिल पर्यटन स्थळे याबाबत माहिती होणे तसेच येथील आदिवासी नागरीकांच्या सुप्त गुणांना वाव व चालना मिळण्याकरीता तसेच आदिवासी बांधवाना रोजगार उपलब्ध करण्याचे उद्देशाने भव्य स्तरावर प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांचे वतीने “माडीया सांस्कृतिक महोत्सव- 2022” चे आयोजन 26 ते 28 मे 2022 या कालावधीत करण्यात आला आहे. या महोत्सवाचे मुख्य अतिथी राज्यपाल महामाहिम भगतसिंह कोश्यारी हे उद्घाटन करणार आहेत.
या महोत्सवादरम्यान विविध क्रीडा, नृत्य, खाद्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकनृत्य स्पर्धा (रेला )
भामरागड तालुक्यामधील आदिवासी समाजाचे रेला नावाचे नृत्यप्रकार प्रसिध्द असुन त्या व्यतिरिक्त इतर आदिवासी नृत्यप्रकार असल्याने रेला नृत्य स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली आहे. एका संघात 20 स्पर्धक असावेत. केवळ पारंपारीक नृत्य, पारंपारीक वाद्याचा वापर करुनच सादरीकरणास परवानगी असल्याने स्पर्धेकरिता आवश्यक सर्व साहित्य/ वाद्य सोबत आणावे लागेल. सादरी करणाकरीता 20 मिनीटाचा अवधी दिला जाईल. प्रथम नोंदणी करणाऱ्या 20 संघाला प्रवेश दिला जाईल. स्पर्धेचे गुण पारंपारीक वेशभुषा , गीत, गाणी, नृत्य, वाद्य यावर दिल्या जातील. सदर स्पर्धेचे प्रथम पारितोषिक- रुपये 51000/-, द्वितीय पारितोषिक- रुपये 31000/- , तृतीय पारितोषिक- रुपये 21000/- राहील.
व्हॉलिबॉल स्पर्धा
भामरागड तालुका हा जंगलाने व्याप्त व डोंगराळ प्रदेश असल्याने येथील युवा काटक असुन ते व्हॉलिबॉल या क्रिडा प्रकारात पारंगत असल्याने ही स्पर्धा घेण्यात येत असुन प्रथम नोंदणी करणाऱ्या 30 फक्त पुरुष संघाना प्रवेश असेल. एका संघात 6 + 3 राखीव याप्रमाणे 9 खेळाडू भाग घेतील. सदर स्पर्धेचे प्रथम रु. 51000/- द्वितिय रु. 31000/- तृतिय रु. 21000/- पारितोषीकांची रक्कम राहील.
कबड्डी स्पर्धा
भामरागड तालुका हा जंगलाने व्याप्त व डोंगराळ प्रदेश असल्याने येथिल युवा काटक असुन ते कब्बडी या क्रिडाप्रकारात पारंगत असल्याने ही स्पर्धा घेण्यात येत असुन प्रथम नोंदणी करणाऱ्या 30 फक्त पुरुष संघाना प्रवेश असेल. एका संघात 7 + 3 राखीव याप्रमाणे 10 खेळाडू भाग घेतील. प्रत्येक सामना 15-15 मिंनीटाचे दोन सत्रात राहील, सदर स्पर्धेचे प्रथम रु. 51000/-द्वितिय रु. 31000/- तृतिय रु. 21000/- पारीतोषीकांची रक्कम राहील.
नौकायन स्पर्धा
भामरागड तालुक्यामध्ये इंद्रावती, पामुलगौतम व पर्लकोटा इत्यादी बारमाही वाहणा-या नद्या असुन त्यामध्ये मच्छीमारी तसेच खेड्यांतर्गत वाहतुकीकरीता लाकडापासुन करण्यात आलेले प्रचलीत डोंगा या साधनाचा वापर वर्षभर करण्यात येतो. त्यामुळे येथिल आदिवासी बांधवांना नौका चालविण्यात सराव झाल्यामुळे तसेच ते उत्तमरीत्या नौका वहन करु शकत असल्याने नौकायन/डोंगा/ नाव स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रथम नोंदणी करणाऱ्या 30 संघाला प्रवेश दिल्या जाईल व संघात दोन पुरुष व एक महिला असे तीन स्पर्धक भाग घेतील. सर्व स्पर्धकांना पोहता येणे बंधनकारक आहे. डोगा हा आयोजकाकडुन पुरविण्यात येत आहे. सदर स्पर्धेचे प्रथम रु. 15000/- द्वितिय रु. 10000/- तृतिय रु. 7000/- पारीतोषीकांची रक्कम राहील.
तिरंदाजी ( तिर कमठा ) व गुलेल
भामरागड तालुक्यातील आदिवासी बांधव अजुनही मोठ्या प्रमाणावर शिकार करुन आपली उपजिवीका चालवितात. खरीप हंगामामध्ये निघणारे धान्य खाण्याअगोदर संपूर्ण गावातील नागरीक जंगलामध्ये शिकार केल्याशिवाय नविन धान्य खात नाहीत. या चालीरीतीला स्थानिक भाषेमध्ये “पंडुम” असे संबोधल्या जाते. त्यामुळे पशु- पक्षांची शिकार करणे हे त्यांचे संस्कृतीचा भाग असल्याने शिकार करण्यात ते पारंगत आहेत. व ते तिरकमठा व गुलेल च्या वापर करुन ते शिकार करीत असल्याने त्याच्या वापर सराईतपणे करीत असल्याने त्यांचेमधील उत्तम नेमबाजांची स्पर्धा घेण्यात येत असुन ही वैयक्तीक स्पर्धा आहे. यात प्रथम नोंदणी करणाऱ्या 50 महिला व 50 पुरुष यांना सहभाग घेता येईल. स्पर्धकांने स्वत:चे पारंपारीक तिर कमठा व गुलेल सोबत आणणे बंधणकारक आहे. अंदाजे 20 मिटरचे अंतरावरुन नेम लावण्याचे तीन संधी देण्यात येईल.
तिर कामठा व गुलेल स्पर्धेचे प्रथम रु. 10000/- द्वितिय रु. 7000/- तृतिय रु. 5000/- पारीतोषीकांची रक्कम स्वतंत्ररित्या राहील.
क्रॉस कंट्री स्पर्धा
भामरागड तालुका हा जंगलाने व्याप्त व डोंगराळ प्रदेश असल्याने येथिल आदिवासी युवा काटक असुन ते न- थकता अनेक किलोमिटरचे अंतर पायदळी तुडवत असल्यामुळे क्रॉस कंट्री या धावण्याच्या क्रिडा प्रकार आयोजित करण्यात आलेला असुन सदर स्पर्धा एकुण 3 किमी अंतर धावण्याची राहील. सदर स्पर्धा खालीलप्रमाणे तिन प्रकारात घेण्यात येत आहे.
वयोगट 12 ते 40 वर्ष पुरुष , वयोगट 12 ते 40 वर्ष महिला , वयोगट 40 वर्षावरील महीला व पुरुष एकत्रित वरील तिनही प्रकारात प्रत्येकी प्रथम रु. 10000/-द्वितिय रु. 7000/- तृतिय रु. 5000/- पारीतोषीकांची रक्कम राहील.
पांरपारिक वेशभुषा
भामरागड तालुका हा जंगलाने व्याप्त व डोंगराळ प्रदेश असुन येथिल आदिवासी त्यांचे पेन कर्साळ या सणाचे वेळी पारंपारीक वेषभुषा व पारंपारीक दागदागिण्यांचे परीधान करतात. बाहेरील जगाला त्याबाबत माहिती होण्याच्या उद्देशाने सदर स्पर्धा आयोजित करण्यात असुन ही वैयक्तीक स्पर्धा आहे. यात प्रथम नोंदणी करणाऱ्या 50 महिला व 50 पुरुष यांना सहभाग घेता येईल. स्पर्धकांने स्वत:चे पारंपारीक वेशभुषेचे साहित्य आणने बंधणकारक आहे. यात स्पर्धकांना वयाची अट राहणार नाही. सादरी करणाकरिता केवळ 5 मिनीटाचा अवधी दिला जाईल.
वरील प्रत्येकी प्रथम रु. 10000/- द्वितिय रु. 7000/- तृतिय रु. 5000/- पारीतोषीकांची रक्कम राहील.
हस्तकला स्पर्धा (बांबु, लाकुड व लोखंडापासुन निर्मीत)
भामरागड तालुका हा जंगलाने व्याप्त व डोंगराळ प्रदेश असल्याने व येथे विविध प्रकारचे वृक्ष , बांबु मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे येथिल आदिवासी बांधव त्यांच्या दैनदिन जिवनात त्यापासुन निर्मीत वस्तुंचा वापर करीत असल्याने बाहेरील जगताला त्याबाबत माहीती होण्याचे दृष्टीने व बांबु, लाकुड व लोखंडापासुन हाताने तयार केलेल्या वस्तु विक्री करण्याचे उद्देशाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असुन ही वैयक्तीक स्पर्धा आहे. यात प्रथम नोंदणी करणाऱ्या 25 महिला व 25 पुरुष यांना सहभाग घेता येईल. फक्त हाताने तयार करण्यात आलेल्या वस्तुच स्पर्धेत ग्राह्य धरण्यात येईल. सदर स्पर्धेचे प्रथम रु. 10000/- द्वितिय रु. 7000/- तृतिय रु. 5000/- पारीतोषीकांची रक्कम राहील.
पारंपारीक खाद्यपदार्थ
भामरागड तालुका हा जंगलाने व्याप्त व डोंगराळ प्रदेश असल्याने व येथे जंगलातील विविध प्रकारचे कंद व रानमेवा , औषधी गुण असलेले रानटी भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे येथिल आदिवासी बांधव कंद,रानभाज्यांचा तसेच ताड वृक्ष व गोरगा या वृक्षापासुन मिळणारे पेयाचे दैनंदिन जिवनात वापर करीत असतात. आदिवासी बांधवाचे वैशिष्ट्यपूर्ण खाद्य जिवनाची ओळख बाहेरील जगताशी होण्याकरीता त्यांनी विविध प्रकारचे कंद व बांबु, रानमेवा, औषधी गुण असलेले रानटी भाज्यांपासुन बनविलेल्या ,खाद्यपदार्थांची स्पर्धा घेण्यात येवून विक्रीकरीता स्टॉल लावण्यात येत आहे. यात प्रथम नोंदणी करणाऱ्या 25 महिला व 25 पुरुष यांना सहभाग घेता येईल. फक्त हाताने तयार करण्यात आलेल्या 2 पदार्थ स्पर्धेत ग्राह्य धरण्यात येईल. सदर स्पर्धेचे प्रथम रु. 10000/- द्वितिय रु. 7000/- तृतिय रु. 5000/- पारीतोषीकांची रक्कम राहील.
सदर माडीया सांस्कृतिक महोत्सव- 2022″ मध्ये विविध प्रकारचे 50 स्टॉल भामरागड महोत्सवामध्ये लावण्यात येतील. यामधुन येथील आदिवासी संस्कृती व कलेची ओळख बाहेर जगताला होईल. तसेच या भांगातील लोंकाना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल. या महोत्सवामध्ये आदिवासी समुहाने तयार केलेल्या पदार्थ व वस्तु व संस्कृतीचे उत्तम प्रदर्शन केल्या जाईल.
सदर महोत्सव 26 मे 2022 ते 28 मे 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेले असुन या महोत्सवाचे मुख्य अतिथी राज्यपाल महामाहिम भगतसिंह कोश्यारी हे राहतील. सदर महोत्सव कालावधीत सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत व दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व प्रकारचे मैदानी खेळ आयोजित केल्या जातील. तसेच सांस्कृतीक कार्यक्रमाची वेळ ही विशेषत: सायंकाळची असेल.
कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण
समुह निवासी शाळेचे पटांगण, मैदानी खेळाचे ठिकाण – वनपरिक्षेत्र अधिकारी, कार्यालय भामरागड, तिर कामठा व गुलेल खेळाचे ठिकाण- तहसिल कार्यालयाचे मागील बंधीस्त मैदान व नौकानयन ही स्पर्धा पामुलगौतम नदीवर शासकिय वनविश्रामगृहाजवळ घेतल्या जातील.
सदर स्पर्धेत सहभाग घेण्याकरीता स्पर्धक हा गडचिरोली जिल्हयातील आदिवासीच असणे बंधनकारक आहे. इतर जिल्हयातील व्यक्तींना स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. सदर स्पर्धेची नोंदणी दिनांक 06/05/2022 पासुन ते दि. 20/05/2022 पर्यंत ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष अर्जाद्वारे करण्यात येईल. स्पर्धेचे ऑनलाईन नोंदणी https://madiamahotsav.pobhamragad.com/ या वेबसाईटवर होईल. तसेच नोंदणी करीत असतांना येणारे अडचणीचे निराकरण करण्यासाठी तसेच स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी खालीलप्रमाणे हेल्पलाईन क्रमांक असुन सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत कार्यान्वित राहतील.
1) 07134-295050
2) 9420454529
3) 7304992862
4) 9011294005
5) 8275488525.