The गडविश्व
गडचिरोली, २५ जुलै : जिल्ह्यातील गडचिरोली व देसाईगंज नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकी संबंधाने राज्य निवडणूक आयोगाने २२ जुलै २०२२ रोजी जाहिर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढणे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण सोडत पध्दतीने निश्चित करावयाचे आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व देसाईगंज नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण व सोडत प्राधिकृत केलेल्या उप विभागीय अधिकारी/उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली संबंधित नगरपरिषदेच्या सभागृहात गुरुवार २८ जूलै, २०२२ रोजी वेळ सकाळी ११. ०० वाजता काढण्यात येणार आहे.
वरील प्रमाणे जागा निश्चित करण्याच्या सोडतीच्या वेळी ज्या नागरीकांना इच्छा असेल त्यांनी आरक्षण निश्चितीच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास आवाहन करण्यात येत आहे.
