३१ मार्च रोजी राज्यसभेच्या १३ जागांसाठी मतदान

601

The गडविश्व
नवी दिल्ली : राज्यसभेच्या १३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जारी करण्यात आला आहे. ३१ मार्च रोजी . राज्यसभेच्या १३ जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण सहा राज्यांमध्ये राज्यसभेच्या या १३ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. यात आसाम (२ जागा), हिमाचल प्रदेश (१), केरल (३), नागालँड (१), त्रिपुरा (१) तर पंजाबमधील ५ जागांचा समावेश आहे. आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, नागालँड आणि त्रिपुरामधून राज्यसभेच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ दोन एप्रिल रोजी तर पंजाबमधील पाच सदस्यांचा कार्यकाळ ९ एप्रिलला पूर्ण होणार आहे.
आसाममधून राणी नराह, रिपुन बोरा, हिमाचल प्रदेशमधील आनंद शर्मा, केरळमधील एके ॲटनी, एमव्ही श्रेयंस कुमार, सोमाप्रसाद के, नागालॅंडमधील के जी केन्ये, त्रिपुरामधील झरना दास तर पंजाबमधील सुखदेव सिंह, प्रताप सिंह बाजवा, नरेश गुजराल, शमशेर सिंह, श्वेत मलिक या सदस्यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे.
राज्यसभेमध्ये सदस्यांची संख्या २५० इतकी असते. यापैकी २३८ सदस्यांती निवड राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील विधिमंडळे करतात. तर १२ सदस्य राष्ट्रपती नॉमिनेट करतात. राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) १२ लोकांची निवड राज्यसभेवर सदस्य म्हणून करु शकतात.
राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडून दिले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here