– गडचिरोली पोलिसांची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली : नजीकच्या पुलखल येथील विक्रेत्याकडे पावडर मिश्रित ३५ लिटर सिंधी नष्ट केल्याची कृती गडचिरोली पोलिस, गाव संघटन व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या शुक्रवारी केली.
गडचिरोली तालुक्यातील पुलखल येथे गाव संघटनेच्या प्रयत्नानी अवैध दारूविक्री बंद आहे. मात्र, आंध्रप्रदेश राज्यातील एक इसम पुलखल येथे भाड्याच्या घरात राहून पावडर मिश्रित सिंधीची विक्री करीत आहे. यामुळे गावातील लहान-मोठ्या मुलांना व नागरिकांना सिंधीची पिण्याची सवय लागली आहे. या सिंधी पासून नशा येत असून आरोग्यास हानीकारण आहे. त्यामुळे गाव संघटनेच्या माहितीनुसार गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने सदर विक्रेत्याच्या घराची तपासणी करून जवळपास ३५ लिटर पावडर मिश्रित सिंधी नष्ट केली. त्यानंतर पुन्हा विक्री केल्यास कारवाई करण्याचे ठणकावून सांगण्यात आले. ही कारवाई पोलिस हवालदार कोसनाके, प्रमोद वाळके, होमगार्ड यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांच्यासह गाव संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.